5G तंत्रज्ञान ( 5G Technology) काय आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती


नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय की मानवाने मोबाईल नेटवर्क च्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे .






  1. 1G (First Generation) ची सुरुवात 1980 पासून झाली
  2. 2G (Second Generation) ची सुरुवात1990 पासून झाली
  3. 3G (Third Generation) ची सुरुवात2000 पासून झाली
  4. 4G (Forth Generation) ची सुरुवात 2010 पासून झाली
  5. 5G (Fifth Generation) ची सुरुवात 2021झालेली आहे.
एक काळ असा होता की लोकांच्या हातात मोबाइल नव्हते. असले तरी ते खूप श्रीमंत लोकांकडेच असायचे. मग तंत्रज्ञान क्रांती झाली आणि मोबाइल सामान्य माणसाच्या हातात येऊ लागला. मग 2G आलं मोबाईलमध्ये इंटरनेट होतं, परंतु खूप धिम्या गतीने ते चालायचं. त्यानंतर बाजारात 3G आलं, आणि लोकांना वेगवान इंटरनेट मिळू लागलं. 4G  बाजारात आलं आणि त्याने धुमाकूळ घातला .

भारतात काही ठिकाणी 5G वापरायला सुरुवात झालेली आहे. 5G Network in India खूप दिवसापासून 5G Mobile बाजारात उपलब्ध झालेले आहेत. भारतात 5-जी Network अजून चाचणी च्या स्तरावर आहे काही मोठमोठ्या शहरांमध्ये 5G सुरु करण्यात आलेले आहे आणि लवकरच पूर्णपणे सुरू करण्यात येणार आहे
. (5g Information in Marathi) 

5G. तंत्रज्ञान काय आहे ?

जग हळू हळू Smarter आणि Advanced Technology कडे पाऊल उचलत आहे. 5G Technology ही दूरसंचार टेक्नोलॉजी शी संबंधित आहे. 5G Technology या नवीन तंत्रज्ञानात रेडिओ लहरी-Radio Waves आणि विविध प्रकारच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी Radio वापरल्या जातात. दूरसंचार क्षेत्रात आतापर्यंत आलेल्या सर्व तंत्रज्ञानाच्या तुलनेत 5G तंत्रज्ञान अतिशय नवीन आणि जलद तंत्रज्ञान आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा अंतिम स्वरूप ITU म्हणजेच International Communication  Union ने निश्चित केला आहे.

5G नेटवर्क ची वैशिष्ट्ये

या तंत्रज्ञानाचा वेग सुमारे प्रती सेकंदाला सेकंदात 20GB पर्यंत डेटा ट्रान्स्फरचा वेग मिळू शकेल.सर्व कामे झपाट्याने होतील व अतिशय वेगाने आणि सहजपणे करता येतील.

5G तंत्रज्ञान म्हणजे काय ?






मोबाईल नेटवर्क ची पाचवी पिढी म्हणजेच 5G-Fifth Generation of Mobile Internet Technology. जसे 1G, 2G, 3G आणि 4G आहे त्याचप्रमाणे 5G Network Technology आहे. 5G चा निर्माण या जगातल्या प्रत्येकाला Virtually Connect करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेला आहे. 
 5G Mobile Network वापरकर्त्यांना अनेक Gbps (Gigabyte Per Second) इंटरनेट स्पीड प्रदान करण्याची क्षमता ठेवत आहे. Gb Per second म्हणजे एक सेकंदात 1Gb पेक्षा जास्त आकाराचा डेटा Transfer करण्याची क्षमता. ही Technology विशेषतः High Internet Speed साठी Design करण्यात आलेली आहे.

5G Mobile Network हे मध्ये कमी जागेत जास्त मोबाईल ला कनेक्ट करू शकते. एका चौरस किलोमीटर मध्ये 1000 मोबाईल ला इंटरनेट सेवा पुरवण्याची टाकत 5G मध्ये आहे. 

5G तंत्रज्ञान कसे कार्य करतो






  5G मध्ये Signal Transmit करण्यासाठी एक नवीन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. कोणतेही Wireless Device एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी एका विशिष्ट रेंज ची Frequency वापरते. 5G तंत्रज्ञान Sub 6 बँड रेंज मधील Frequency वापरते, Sub 6 बँड ची Range 600 MHz ते 6 GHz पर्यंत असते. या Frequency Range मधील काही 4G LTE मध्ये पण वापरण्यात आलेली आहे. 5G Devices यापेक्षा खूप जास्त म्हणजे 24 GHz ते जास्तीत जास्त 86 GHz एवढी Frequency वापरतात. जशी Frequency जास्त असते, त्यानुसार नेटवर्क ची स्पीड जास्त असते.


5G तंत्रज्ञानाचे फायदे 


  • 5G च्या मदतीने औद्योगिक क्षेत्रातील उपकरणे आणि प्रोसेसिंग युटिलिटी, कम्युनिकेशन यामध्ये कमालीची गती वाढणार आहे. तसेच ऑटोमोबाईलच्या जगतात सुरक्षा देखील पूर्वीपेक्षा अधिक पटीने विकसित आणि उत्तम होईल.
  • 5G तंत्रज्ञानामुळे सुपर हाय स्पीड इंटरनेटची कनेक्टिव्हिटी केली जाईल. त्यामुळे या क्षेत्राचा जलद गतीने कनेक्टिव्हिटी होऊन विकास प्राप्त होईल.
  • 5G मुळे, ड्रायव्हरलेस उपकरणे, आरोग्य विभागातील विविध सेवा, ऑनलाइन सेवा इत्यांदिमध्ये  अधिक गती प्राप्त होऊन सुलभ होतील.Internet of Things च्या क्षेत्रात खूप प्रगती होणार.
  • स्मार्टफोन मध्ये कमी बॅटरी खर्च होणार

5G तंत्रज्ञानाचे तोटे


  •  5G च्या High Radio Frequency मुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते.
  • तांत्रिक संशोधक व तज्ञांना संशोधनात असे आढळून आले की 5G तंत्रज्ञानाच्या लहरी भिंतींना भेदण्यास असमर्थ आहेत. यामुळे त्याची घनता फार दूरवर जाऊ शकत नाही आणि याचा परिणाम म्हणून त्याच्या नेटवर्कमध्ये कमकुवतपणा येवू शकतो.
  • याशिवाय पाऊस, झाडे आणि वनस्पतींसारख्या नैसर्गिक संसाधनांमध्ये प्रवेश करण्यासही असमर्थ असल्याचे संशोधकांचे मत आहे, त्यामुळे नेटवर्कमध्ये समस्या निमार्ण होऊ शकते.
  •  5G तंत्रज्ञानामुळे Cyber Crimes वाढण्याची आशंका आहे

Conclusion



5G तंत्रज्ञान म्हणजे काय, 5g Information in Marathi हा लेख कसा वाटला?, हे मला कंमेंट करून कळवा. कॉम्पुटर, ब्लॉगिंग, इंटरनेट संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईट ला परत- परत भेट देत राहा.